मीटर बसवून देण्यासाठी लाचेची मागणी करणारा वायरमन एसीबीच्या जाळ्यात
भुसावळ-
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे मीटर बसवून देण्यासाठी ग्राहकाकडे वायरमनने 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली म्हणून वायरमनविरुद्ध वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राहत असलेल्या 29 वर्षीय तक्रारदार याने घराला नविन वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच वरणगांव कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता. आणि डिमांड नोट भरली होती. त्यानंतर डिमांड नोटची झेरॉक्स प्रत सही शिक्का मारून त्याची ओसी घेतली. तक्रारदार यांनी वायरमन अमीन शहा करामत शहा वरिष्ठ तंत्रज्ञ वर्ग-4, विज वितरण विभाग वरणगांव शहर यांना मीटर बसविणे बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की तुमचे वीज मीटर बसवून देण्यासाठी मला 2 हजार रुपये द्यावे लागेल अशी लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचा समक्ष पडताळणी केली असता वायरमन अमीन शहा करामत शहा यांनी तडजोडी अंती 1 हजाराची रुपयांची मागणी केली. यातील वायरमन हे लाच मागत असताना त्यांना सापळा कारवाईचा संशय आला म्हणून त्यांनी तक्रारदार यांच्या गळ्यातील व्हॉइस रेकॉर्डर जबरदस्तीने हिसकावून घेतले. सरकारी मालमत्तेचे नुकसान केले म्हणून संशयित लाच मागणाऱ्या वायरमन विरोधात वरणगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेतले आहे.
सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक स.फौ.सुरेश पाटील
सफौ दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे एन. एन. जाधव, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो.ना.किशोरमहाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ अमोल सूर्यवंशी यांनी हि कारवाई केली.