श्री क्षेत्र तपेश्वर महाराज मंदिरास पर्यटन विकास कामांसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर;ग्रामस्थांनी केला आनंदोत्सव साजरा.
पाचोरा-
तालुक्यातील लोहारा येथील अतिप्राचीन व जागृत देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र तपेश्चर महाराज मंदिरास राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष भाऊ महाजन यांच्या अथक प्रयत्नाने आणि लोहारा येथील भाजपाचे जेष्ठ नेते शरद आण्णा सोनार यांच्या प्रयत्नाने मंदिराच्या सुशोभीकरण, प्लॉअरब्लॉक,सभामंडप,संरक्षण भिंत व इतर कामांसाठी जवळपास अडीच कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
पर्यटस्थळांच्या ठिकानी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये जळगांव जिल्ह्यातील कामांसाठी 250,00 लक्ष एवढ्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
स्थंभ क्र.4 येथे नमूद केल्याप्रमाणे ऐकून रुपये 37.50 लक्ष एवढा निधी सन 2023-24 मध्ये जिल्हाधिकारी ,जळगांव यांना वितरित करण्यास या शासन निर्णया व्दारे मान्यता देण्यात आली आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे लोहारा सह परिसरातील भक्तगणात आनंद झाला आहे.
लोहारा येथील ग्रामस्थांनी,मंदिराचे विश्वत संचालक मंडळाने, परिसरातील जनतेने राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीषभाऊ महाजन,भाजपाचे जेष्ठ नेते शरद आण्णा सोनार व जळगाव जिल्हा परिषेदेचे माजी बांधकाम अभियंता श्री जे.के.चव्हाण (काका ) यांच्या अथक परिश्रमामुळे सदर मंदिराच्या प्रकरणास त्वरित चालना मिळाल्याने ,यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे.आता नक्कीच तपेश्चरमहाराज मंदिराचे भाग्य कित्येक वर्षांनी उजळणार आहे.