पिंपळगाव (हरे) येथे यशस्वीरीत्या सर्पमित्रांने केले अजगराचे रेस्क्यू
पाचोरा (संपादक कुंदन बेलदार)
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकरी प्रितम बडगुजर यांच्या शेतात अजगर असल्याची माहिती सर्पमित्र दिनेश गायकवाड यांना मिळाली तर गायकवाड यांना अजगर पकडण्यासाठी बोलवण्यात आले असता सर्पमित्र व टिम त्यांच्या सहकाऱ्यांनी बडगुजर यांच्या विहीरीत पडलेल्या अजगराला अथांग प्रयत्न करत बाहेर काढण्यात यश आले. माता पिता गोशाळेचे अध्यक्ष तथा सर्पमित्रव गायकवाड यांनी अजगराचे निरीक्षण केले असता तो नर असुन जात भारतीय अजगर असल्याचे सांगितले तर विहीरीच्या कडेला झाडी होती व त्या झाडाला सुगरण जातीच्या पक्षांचे घरटे होते. तर अजगर हा पक्षाची अंडी किंवा पक्षी खाण्यासाठी आला असावा आणि झाडाच्या फांदीवरून विहीरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज सर्पमित्र दिनेश गायकवाड यांनी लावला. अजगर पकडते वेळेस सर्पमित्र मनोज गायकवाड,मयुर रामेश्वरी, गजानन भाऊ,प्रितम बडगुजर, सर्पमित्र दिनेश गायकवाड यांनी सहकार्य केले. आपल्या परीसरात सर्प निघाल्यावर त्यांना मारू नये आपल्या परीसरातील सर्प मित्र बोलवून घ्यावे असे आवाहन केले.