“अन्याय अत्याचार निर्मुलन समितीतर्फे रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर संपन्न.
ओझर (मिग) प्रतिनिधी-
२३ मार्च रोजी ओझर येथील सिध्दीविनायक सेलिब्रेशन हाॅल येथे अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या वतिने महिला रोजगांर स्वयंरोजगार मार्गदर्शन वैचारिक शिबीर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक संतोषजी शिंदे साहेब यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून तर समितीचे संस्थापक अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न झाले. शिबिराचे प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले प्रतिमेस शिंदे संतोष यांचे हष्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सकाळी ११ वाजता प्रारंभ होऊन ५ वाजता समारोप करण्यात आला. सुरूवातीस चांदवड तालुकाध्यक्ष परवीन बागवान यांनी स्वागतगीत गायले तर प्रास्ताविक जिल्हा संघटक अशोकभाऊ गांगुर्डे यांनी केले.
या शिबीरात यमुनाताई लिंगायत, कैलासजी केदारे, संगिताताई पवार, गोपीनाथ वाघमारे, सुरेश गागुर्डे, सोमनाथ गांगुर्डे. सागर जाधव, असलम शेख, शरिफ खाटीक आदी. मान्यवर विचारपिठावर उपस्थित होते. या प्रसंगी संतोष शिंदे यांनी महिलांना स्वतःचे कुटुंब सांभाळून रोजगार निर्मिती कशी होऊ शकते याचे मार्गदर्शन केले. तसेच अन्याय अत्याचार निर्मुलन समितीत अंतर्गत महिलांसाठी भाजी-भाकरी केंद्र, कापडी पिशव्या शिवणे, रोपटे तयार करणे, टी स्टाॅल, हाॅटेलिंग, ढाबा, पापड, कुरडई, मसाला उदयोग, बेदाना प्रक्रिया, गिरगाई, शेळी, कुक्कुटपालन, ब्युटीपार्लर, पॅकेजिंग, कीराणा दुकान, पोहे बनविणे, पिठाची गिरणी, मोटारगाडी सर्विसिंग सह अश्या बऱ्याच घरगुती उद्योगांमधून महिलांना उत्पन्नाचा मार्ग तयार करून दिला जातो याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा उद्योग केंद्र, खादीग्राम उद्योगासह विविध महामंडळाकडून दीले जाणारे स्वयंरोजगार व्यवसाय लघुउद्योग संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानाहुन रविंद्रदादा जाधव म्हणाले की महीला युवती युवक व पुरुषांनी उज्ज्वल भविष्यासाठी मोठ्या उद्योग धंद्याची स्वप्ने जरुर बघावीत मात्र कुठल्याही धंद्याला छोटे समजु नये रोजगांर स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण प्रामाणिकपणे व गांभिर्याने आत्मसात करून उद्योग व्यवसाय धंदा लघुउद्योग टाकुन स्वताची व कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन केले.
या शिबीरात रेखा बोढारे, माया मोहीते, रोहीनी वाघ, प्रिती देशमुख, सोनाली रोकडे, वर्षा हीरे, योगिता दळवी, अरबाज शेख, अलिशा शहा, सुलोचना शेलार, सरला निकम, शोभा हुसळे, शारदा वाघमारे, मनिषा थोरात, वृषाली शेलार, परिघा बागुल, श्रीकांत सांब, प्रियंका पवार, सोनाली मोरे, ज्योती सुरसावळे, सागर जाधव, वर्षा बोरसे, फरजाना शेख, हिराबाई जमधाडे आदींसह पन्नास महीलां पुरुष सहभागी झाले होते. शेवटी स्नेहभोजन व राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.