बिबट्याचा हल्यात,दोन शेतमजूर गंभीर जखमी; पाचोरा तालुक्यातील घटना
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथूनच जवळ असलेल्या कोकडी तांडा येथील गावातील शेतमजुरी करणाऱ्या २ मजुरांवर गावाजवळीलच शेतशिवारात बिबट्याने हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना आज दिनांक २६ मार्च २०२४ मंगळवार रोजी सायंकाळी ०५:३० वाजेच्या सुमारास घडली आहे, पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकडी तांडा येथील गावाजवळील शेत शिवारात मजुरीस गेलेल्या सरदार चव्हाण (वय ३०) व भिवसिंग मांगो (वय ५०)या दोघांवर बिबट्याने अचानक हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केली आहे. जखमी दोघांनाही ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असून त्यांवर पाचोरा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत, तर घटनेची माहिती वन विभागास देण्यात आलेली असून वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असल्याची माहिती प्राप्त होत आहे.