आशिर्वाद सूतगिरणीच्या चेअरमन पदी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील तर व्हाईस चेअरमन पदी प्रमोद सोनार यांची निवड
पाचोरा-
पाचोरा तालुक्यात सह परिसरातील सहकार चळवळीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने आ.किशोर अप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून आशीर्वाद सूतगिरणीची स्थापना करण्यात आली असून या सूतगिरणीच्या नूतन संचालक मंडळाची बैठक संपन्न होऊन यात १८ सदस्यीय संचालक मंडळाने आगामी पाच वर्षांसाठी एक मताने चेअरमन पदी आ.किशोर आप्पा पाटील तर व्हाईस चेअरमन पदी गजानन उद्योग समूहाचे संचालक प्रमोद सोनार यांची बिनविरोध निवड केली आहे. संस्थेच्या कार्यालयात शनिवारी सकाळी ११ वाजता सर्व नवनियुक्त संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे दीपक खांडेकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.संस्थेने सुमारे तीन कोटी रुपयांचे भागभांडवल उभे केले असून लवकरच शासनाकडून जागा खरेदी उभारणीसाठी अनुदान प्राप्त होणार असून यासाठी पाचोरा तालुक्यात विस्तीर्ण अशी जागा खरेदी करून या
सूतगिरणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे.यामुळे पाचोरा- भडगाव सह परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना मोठी मदत मिळणार असून परिसरातील सुमारे एक हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे या सूतगिरणीच्या निर्माणाला चालना मिळाल्याने आनंद व्यक्त आहे.
दरम्यान संचालक मंडळात नरेंद्र उत्तम पाटील,रावसाहेब मनोहर गिरधर पाटील,डॉ भरत लाल पाटील, विजय मेघराज पाटील,रितेश सुरेशचंद्र ललवाणी,रवींद्र कैलास केसवाणी,राजेंद्र धनसिंग पाटील,संजय छगनलाल सिसोदिया,मनोज शांताराम पाटील,गणेश भिमराव पाटील,विनोद रमेशलालललवाणी,चंद्रकांत रंगराव धनवडे,जितेंद्र चंपालाल जैन, संगीता राजेंद्र पाटील, दिलीप बद्रिलाल मोर,सुमित किशोर पाटील,आश्विनी विजय पाटील,सुनीता किशोर पाटील यांची संचालक पदी निवड झाली आहे त्या प्रसंगि स्विय सहाय्यक राजेश पाटील, विष्णु अण्णा चौधरी,प्रविण पाटील ,संदीप पाटील तसेच वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.