मतदानाची टक्केवारी वाढण्याकामी सायकल रॅली काढत केली जनजागृती
पाचोरा-
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार 03 जळगांव लोकसभा मतदार संघांतर्गत 18 पाचोरा विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविणेकामी आज दिनांक 03 एप्रिल 2024 रोजी निवडणूक विभाग उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांनी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये सर्व विभागाचे सुमारे 300 ते 350 अधिकारी / कर्मचारी सहभागी झाले. तसेच मतदारामध्ये मतदानाची जनजागृती करणेकामी भव्य सायकल रॅलीचे सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एम. एम. कॉलेज, भडगांव रोड, पाचोरा येथ पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते.
मतदान जनजागृतीकामी ब्रँड अॅम्बेसेटर म्हणून महिला अॅटो रिक्षा चालक श्रीमती, आशा दगडू भुजंगे रा. नागसेन नगर, पाचोरा यांचा देखील सहभाग नोंदविण्यात आला असुन जनजागृती रॅलीत महसूल विभागातील श्री. प्रविण चव्हाणके, तहसिलदार पाचोरा श्री. विजय बनसोडे, तहसिलदार भडगांव, श्री. सुभाष कुंभार, नायब तहसिलदार, उ. वि. अ. कार्यालय पाचोरा, अवल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, तलाठी व शिपाई कर्मचारी नगरपालिका विभागातील, मुख्याधिकारी, उप मुख्याधिकारी, पंचायत समिती, पाचोरा, गट विकास अधिकारी, शिक्षण विभाग व इतर प्रशासकीय विभाग यांनी देखील सहभाग नोंदविण्यात आलेला होता. रॅलीची सांगता एम. एम. कॉलेज ग्राऊंड, भडगांव रोड पाचोरा येथे श्री. भूषण अहिरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांचे भाषणातून करण्यात आली.