जामनेर!शेकडो वर्षांपासून सुरू असलेली बारागाड्या ओढण्याची परंपरा आजही कायम..
जामनेर–
जामनेर येथील शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवीत सालाबादाप्रमाणे या वर्षी शहरातील श्रीराम पेठ भागातील मंमादेवी दसरा मैदान ते श्रीराम मंदिर पर्यंत खंडेराव महाराजांच्या नावाने परंपरागत पद्धतीने बारागाड्या ओढण्याची धार्मिक परंपरा जोपासत साजरा करण्यात आली.या बाबत सविस्तर माहिती अशी की श्रीराम पेठ भागातील खंडेराव मंदिरापासून ते श्रीराम मंदिर पर्यंत भक्तांकरवी बारागाड्या ओढल्या जातात. शेकडो वर्षांपासूनची पारंपारिक पद्धत आजच्या काळात सुद्धा श्रीराम पेठ वासीयांकडुन टिकवली जात आहे. मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात शांततेत पार पाडण्यासाठी बारागाड्या उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. डोळ्याचे पारणे फिटेल असा भव्य दिव्य बारागाड्या उत्सव बघण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच शहरातुन नागरीकांचा महासागर उसळला होता. भव्य दिव्य सोहळा मोबाईल कॅमेर्यात तरुणांनी कैद केला. जामनेर नगरपालिकेच्या वतीने तसेच दिवाबत्ती आरोग्य विभागाच्या वतीने या सोहळ्यात विशेष सहकार्य लाभले. बारागाड्या उत्सवास गालबोट लागु नये यासाठी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.