रफिक काकर हल्यातील हल्लेखोरांवर 307, प्रमाणे कारवाई करण्याची केली निवेदनाद्वारे मागणी
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथुन जवळच असलेल्या भोकरी गावात काल दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास भोकरी येथील मशिदी जवळ एका ४० वर्षीय इसमाला पाच ते सहा जणांनी रस्त्यावर एकटे गाठून त्यापैकी एकाने सदर इसमावर धारदार शस्त्राने सपासप वार करत हल्ला चढवला व इतरांनी जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली होती.
या हल्ल्याचे कारण म्हणजे भोकरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या अपातत्रेतून हा वाद ऊफाळून आला व याच वादातून हा जीवघेणा हल्ला केला असल्याचे सिद्ध झाले आहे. या घटनेत भोकरी येथील रहिवासी रफिक काकर यांना पाच ते सहा इसमांनी एकटे गाठून जबरदस्त मारहाण केली या पाच ते सहा जणांपैकी एकाने रफिक काकर यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करत हा जीवघेणा हल्ला चढवला या जीवघेण्या हल्ल्यात रफिक काकार हे जबर जखमी झाल्यामुळे त्यांना तातडीने पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगांव येथे पाठविण्यात आले असून त्यांच्यावर अद्यापही जळगाव येथे उपचार सुरु आहेत.
या हल्यात सामील असलेल्या हल्लेखोरांवर आचारसंहिता कालावधीत शस्त्र बाळगणे, शस्त्रांचा वापर करुन गावात दहशत निर्माण करणे, धर्मस्थळावर नमाज पठण करण्यासाठी आलेल्या रफिक काकार यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवत धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित हल्लेखोरांवर कलम ३०७ तसेच गावात दहशत निर्माण करणे या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन हल्लेखोरांवर कठोरात, कठोर कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन मा. जिल्हा पोलीस अधीक्षक जळगांव यांच्याकडे देण्यात आले असून या निवेदनावर शकील सत्तार, अन्वर दौवुत, लुकमान काकर, गुलाब काकर, अकील चांद, अख्तर रहेमान, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.