ग्रीन फाऊंडेशनच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी गणेश काळभोर
लोणी काळभोर –
लोणी काळभोर- ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या हवेली तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे गणेश काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप व ग्रीन फाउंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे .पर्यावरण संरक्षण करणे,वृक्ष लागवडकरणे,वृक्षांचे संवर्धन करणे ,एक कुंटूब एक झाड ही संकल्पना प्रत्यक्ष राबविणे, शाळांमध्ये, महाविद्यालयात वृक्ष संवर्धन पक्षी बचाव उपक्रम, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे. ग्रीन फाउंडेशन शाखा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचे काम व
वृक्ष चळवळ लोक चळवळ व्हावी या साठी प्रयत्न करणार असल्याचे गणेश काळभोर यांनी सांगितले.
निसर्गाची साखळी टिकवून ठेवण्यासाठी त्याचे वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे.त्या अनुषंगाने ग्रीन फाउंडेशन राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत.