मोटरसायकल वरुन अवैधरित्या दारु वाहतुक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पाचोरा-
शहरातुन अवैधरित्या दारुच्या बाटल्या मोटरसायकल वरुन घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी कारवाई केली आहे. या धडक कारवाई मुळे अवैधरित्या चोरटी दारु वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पाचोरा शहरात गस्तीवर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी व पो. काॅं. योगेश पाटील हे कर्तव्यावर असतांना रेल्वे स्थानक रोडवरील भगवती फोटो समोरुन मोटरसायकलवरुन दोन तरुण पिशवी घेवुन जात असल्याचे राहुल शिंपी यांच्या निदर्शनास येताच राहुल शिंपी व योगेश पाटील यांनी तरुणांची चौकशी करुन झडती घेतली असता त्यांच्या जवळील पिशवी मध्ये ६ हजार ६५० रुपये किंमतीच्या देशी व विदेशी दारुच्या बाटल्या आढळुन आल्या. शुभम सुरेश पाटील (वय – २६) व रविंद्र शाम कोळी (वय – २५) दोन्ही रा. उत्राण ता. एरंडोल यांना ३० हजार रुपये किंमतीच्या मोटरसायकल सह ताब्यात घेतले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे.