पाचोरा!डोळे स्कॅन करून होईल तालुक्यातील १४५ दुकानांमध्ये रेशनचे वाटप
पाचोरा-
तालुक्यातील १४५ रेशन दुकानदारांना ई पॉस मशिन वितरण करण्यात आले. यामूळे धान्य वाटप करतांना येणाऱ्या अडचणी दुर होणार असून धान्य वितरणात पारदर्शकता येणार आहे. आता नवीन यंत्रात लाभार्थीचे डोळे स्कॅन करून रेशन वाटप होईल. अशी माहिती तहसीलदार प्रविण चव्हाणके यांनी दिली.
पूर्वी अंगठा (थम) देऊन ग्राहकांची पडताळणी व्हायची. त्यात अनेकांच्या अंगठ्यांचे ठसे उमटत नसल्याने धान्य वाटप करताना अडचणी येत होत्या. प्रसंगी वादही उद्भवायचे. आता नवीन यंत्रात लाभार्थीचे डोळे स्कॅन करून रेशन वाटप होईल. यामुळे धान्य वितरणात अधिक पारदर्शकता येईल. दुकानदारांना दिलेल्या ई-पॉस मशीनची वोवासिस कंपनीचे चेतन पाटील, राजू सूर्यवंशी यांनी ऑनलाइन नोंदणी करून दिली. डोळ्यांचे स्कॅनिंग व अंगठ्याचा थम घेऊन धान्य वितरण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले. रेशन दुकानदारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. तालुक्यातील संपूर्ण १४५ रेशन दुकानदारांना नवीन ई-पॉस मशीन वाटप केले. या मशीन वापरून धान्य वितरण कसे करावे ? याची माहिती ओयासिस कंपनीचे तांत्रिक अधिकारी चेतन पाटील, राजू सूर्यवंशी यांनी प्रोजेक्टद्वारे दिली.
पाचोरा तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व १४५ रेशन दुकानांसाठी नवीन ई पॉस यंत्र प्राप्त झाले आहे. या यंत्रांचा वापर करून धान्य वितरण कसे होईल ? याचे प्रशिक्षण सर्व दुकानदारांना पाचोरा तहसील कार्यालयात येथे तहसीलदार प्रविण चव्हाणके यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले. यापुर्वी तालुक्यात १४० रेशन दुकान होती. तालुक्याचा वाढता विस्तार बघता ५ नविन रेशन दुकाने मंजुर झाल्याने सर्व १४५ दुकानदारांना आधुनिक पद्धतीचे ई पॉस मशिन वितरीत करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रविण चव्हाणके, नायब विभागाच्या अव्वल कारकून नायब तहसीलदार रणजीत पाटील,पुरवठा अधिकारी अभिजित येवले, पुरवठा मिस्तरी, भावना सूर्यवंशी उपस्थित होते.
पूर्वी रेशन वितरण प्रणालीमध्ये केवळ अंगठा दिल्यानंतर लाभार्थ्यांची ओळख यंत्राद्वारे पटवली जायची. पण अनेक ठिकाणी वयोवृद्ध नागरिकांचा अंगठ्यांचा ठसा मशिनमध्ये उमटत नव्हता. यामुळे पेच ये वाढायचा. आता नवीन ई – पॉस यंत्रामध्ये लाभार्थ्यांची पडताळणीसाठी डोळे स्कॅनिंगची सुविधा आहे. यामुळे कुणीही रेशन धान्य लाभापासून वंचित राहणार नाही.