निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली पाचोरा पोलीस स्टेशन ची भेट पोलीस निरीक्षक यांनी केले मार्गदर्शन.
पाचोरा –
पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व शिक्षिका यांनी फर्स्ट इयर ते फाईव्ह इयर पर्यंत शिकत असलेले बालगोपाळ विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना शाळेत सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते त्यामध्ये व्यायाम व इतर खेळ तसेच विद्यार्थ्यांना मनोरंजनासाठी सहलीला नेले जाते सर्व जनरल नॉलेज शिकविले जाते त्यामुळे विद्यार्थी दिमाखाने तरबेज व हुशार होत असतात पण मुलांना नेहमी पोलीस काका पोलीस दादा अनेक कामे करत असतात हेही शिकवले गेले पाहिजे म्हणून प्रत्यक्षात त्यांची भेट घडवून आली आहे.
विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनी निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांनी त्या बालगोपाळांना पाचोरा पोलीस स्टेशनची सहल काढून पोलीस स्टेशन दाखवले व त्यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी सर्व बालगोपाळ विद्यार्थ्यांना पोलिसांबद्दल सर्व माहिती सांगितली तसेच पोलीस स्टेशन मधील सर्व हत्यार पोलीस लॉकअप पोलीस स्टेशन मधील आलेल्या नागरिकांना तक्रारी देण्यासाठी असलेले ठिकाण या सर्व बद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली तसेच राहुल खताळ साहेब यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनी अनेक प्रश्न विचारले त्या प्रश्नावर साहेबांनी त्यांना समजावून सर्व उत्तर असेल मुलांनी विचारलेल्या प्रश्नावर साहेबांनी सर्वांचे कौतुक केले तसेच त्यांनी मुलांना सांगितले आई वडिलांनी दिलेली शिकवण व दिलेला शब्द तुम्ही पाळा पोलिसांबद्दल तुमच्या मनात काही भीती असेल तर ती काढून टाका पोलीस हा तुमच्या संरक्षणासाठी आहे तसेच तुम्ही भविष्यातील जागरूक विद्यार्थी आहे कुठेही काही घटना घडत असल्यास पोलीस स्टेशनला कळवावे भविष्यातील तुम्ही सुद्धा देशाच्या रक्षणासाठी तुमची उज्वल भविष्य करा तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्राचा अभ्यास करा व आपले आई-वडिलांचे नाव उंचवा असे अनेक महत्त्वाचे विषय सांगितले यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते यावेळी पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राहुल खताळ सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे उपनिरीक्षक योगेश गणगे महिला उपनिरीक्षक विजया वसावे, पोलीस कर्मचारी तसेच निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.