पाचोरा! धावत्या रेल्वेतून पडुन मृत्यू झालेल्या इसमाची ओळख पटली
पाचोरा-
कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 25 एप्रिल गुरुवार रोजी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास पाचोरा गाळण रेल्वे स्टेशन दरम्यान उघडकीस आलेली आहे. पाचोरा दूरक्षेत्र लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून पाचोरा जंक्शन पासून जवळ पाचोरा ते गाळण रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या खांबा किलोमीटर क्रमांक 371/16/18 नजीक कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रकाश धुडकू कदम रा. गोराडखेडा ता.पाचोरा जि.जळगाव येथील इसम मयत झाला असून घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलीस स्टेशनचे जीआरपीएफ विलास जाधव यांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांचे मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केला होता.
त्या मृतदेहाची ओळख पटलेली असुन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात गोरडखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले , या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.