क्राईमजळगाव जिल्हा

खडकदेवळा! SST पथक तपासणी करतांना सापडला गुटखा; पुढील कारवाईसाठी पाचोरा पोलिसांचा ताब्यात


पाचोरा-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार 03 जळगांव लोकसभा मतदार संघांतर्गत 18- पाचोरा विधानसभा मतदार संघात मा. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जळगांव यांचे आदेशान्वये Static Survillance Team (SST) पथक स्थापन करण्यात आलेले आहेत. सदर पथकास श्री. भूषण अहिरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांचे मार्गदर्शनाखाली नेमणूक केलेले पथक कामकरीत आहेत. सदर पथकाने दिनांक 28/04/2024 रोजी खडकदेवळा खु. ता. पाचोरा येथे तपासणी करीत असतांना सायंकाळी 6.30 वाजता पवन समाधान चव्हाण रा. हनुमंतखेडा ता. सोयगांव जि. छ.संभाजीनगर हा त्याचे मालकीची मोटर सायकल MH-20 FX-9933 यावर बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे तपासणी दरम्यान पथक प्रमुख श्री.अमोल वनसिंग पाटील, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, पाचोरा व त्यांचे पथकातील सहकारी यांना आढळून आला आहे. बंदी असलेल्या गुटख्याची अंदाजित किंमत सोळा हजार असून पकडण्यात आलेला बंदी असलेला गुटखा हा पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार यांचे ताब्यात पुढील कारवाई करीता देण्यात आलेला आहे.

गुटख्याची तस्करी करणाऱ्यांवर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!