स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ शिवसेना शाखा प्रमुख,बुथ प्रमुख, पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मेळावा संपन्न
पाचोरा-
दिनांक ७ मे रोजी सारोळा रोड वरील समर्थ लाॅन्स येथे पाचोरा भडगाव मतदार संघातील शिवसेना शाखा प्रमुख, बुथ प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांचा स्नेह मेळावा मतदासंघांचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तर जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे राधेश्याम चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे , यांची प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.विशाल पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बाजार समिती सभापती गणेश पाटील, उपसभापती पी.ए.पाटील , शिवसेना तालुकाप्रमुख सुनील पाटील,माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, माजी जि.प.सदस्य भुराआप्पा , विकास पाटील. पदमसिंग पाटील, पंढरीनाथ पाटील, डॉ.भरत पाटील, व्यापारी आघाडीचे पाचोरा तालुकाप्रमुख रवि केसवाणी ,समिती संचालक प्रकाश तांबे, युवासेनेचे जितेंद्र जैन, अनिल पाटील भावडू पाटील, सुमीत सावंत, भोला पाटील , आदीं सह दोन्ही तालुक्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
भाजपा जिल्हाउपाध्यक्ष मधुभाऊ काटे शिवसेना भाजप पेक्षाही प्रचारात एक पाऊल पुढे आहे. भविष्यात भाजपा देखील आप्पासाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी प्रचार यंत्रणा राबविताना केलेल्या कामांची दोन्ही तालुक्यातील ३३२ बूथ पैकी ज्या बूथ वर सर्वात जास्त मतदान कार्यकर्ते करून घेतील त्या बूथ प्रमुखांना ५१,हजार रुपयांचे बक्षीस आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
आ.किशोर आप्पा पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले स्मिताताई वाघ यांना लोकसभेत निवडून देण्यासाठी शिवसेना सज्ज आहे. बूथ प्रमुखांनी आपला मतदार कोण, कोठला, विरोधकांचे मतदार कोणते याची माहिती घ्यावी.मतदार यादी बारकाईने वाचून काढावी.२०२४ ची लोकसभा निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आणि अस्मितेची आहे. उमेदवार ह्या मतदार संघाच्याच नव्हे तर आमच्या भगिनी आम्ही मानतो. भविष्यात आम्हाला भाजप ची साथ जरी मिळाली नाही तरी आम्ही १०० टक्के निवडून येणारच आहोत. विरोधकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांना त्यांचा पंतप्रधान कोण हेच माहीत नाही. करण पवार आणि उन्मेष पाटील यांनी कोणती विकास कामे केली नाही. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.