सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा चांगला उपक्रम,“लोकसभा निवडणुकीत मतदान करा, मोफत आरोग्यतपासणीचा लाभ घ्या”
पाचोरा-
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून अनेक मोहिमा राबवण्यात येतात.
अशातच आता सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा तर्फे आगळ्यावेगळ्या प्रकारे जनजागृती करण्यात येतेय.
हॉस्पिटल चे संचालक डॉ. स्वप्निल पाटील दादा आणि बालरोगतज्ञ डॉ. ग्रिष्मा पाटील मॅडम यांनी आपल्या हॉस्पिटल ला 13 आणि 14 मे रोजी लोकसभेला मतदान केलेल्या मतदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहेत.
18 वर्षांखालील लहान मुलांच्या मोफत आरोग्य तपासणी साठी त्यांच्या पालकांनी मतदान केलेले अनिवार्य आहे.
मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि परिपक्व लोकशाहीसाठी ते अवश्य करायला हवे.
तरी 13 मे ला जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे व 13 आणि 14 मे रोजी हॉस्पिटल ला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा तर्फे करण्यात आलेले आहे.