क्राईमजळगाव जिल्हा

पैश्याकरीता नातूनेच केला ८० वर्षीय आजीबाईचा चा खुन; स्थानिक गुन्हे शाखे कडून आरोपीस अटक


पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथे पैश्याकरीता नातुने केलेल्या आजीच्या खुनातील आरोपीतास अवघ्या ४ तासात स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. मा.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो, जळगाव यांनी पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे. हद्दीत पिंपळगाव हरेश्वर गावात राहणारी मयत मंजाबाई दगडु भोई, वय ८० हिस कोणीतरी अज्ञात इसमान तिचे घरात तिला जिवेठार मारुन गोणपाट मध्ये बाधुन ठेवले आहे. तरी सदर घटनास्थळी जावून पुढील तपास करणे बाबत आदेश दिलेत. त्याप्रमाणे मा.श्री किसन नजनपाटील पो.नि.सो, सफौ विजयसिंग पाटील, पोह लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, अकरम शेख, महेश सोमवंशी सर्व नेमणुक स्था.गु.शा. जळगाव, असे फत्तेपुर ता.जामनेर येथून पिंपळगाव हरेश्वर येथे आले. तिथे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती काढली असता मयत मंजाबाई दगडु भोई हिचे बहिणीचा नातू विशाल भोई याने खून केले असल्याची दाट शक्यता असल्याची बातमी मिळाली. त्यावरून विशाल भोई हा कोठे असल्याची माहिती घेता तो पाचोरा येथे मयताचे प्रेतासोबत ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे गेल्या असल्याचे समजले. त्यावरून पिंपळगाव हरेश्वर येथून वरील पथक व पो.हे. कॉ. रणजीत पाटील, जितेंद्र पाटील दिपक आहिरे नेम. पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे. असे निघुन पाचोरा येथे येवून त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल भोई, वय २२, रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा असे सांगीतले त्यावर त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, माझ्यावर कर्ज झाले असल्याने कर्ज फेड करणे करीता मी आजी कडून पैश्यांची मागणी केली होती. त्यावर आजीने मला नकार दिल्याने मी आजी मंजाबाई हिचा गळा दाबुन तिला जिवेठार मारले त्यानंतर तिचे हातातील चांदीचे गोटपाटल्या पैकी १ गोटपाटली व कानातील सोन्याच्या बाळया काढून घरात असलेल्या गोणपाट मध्ये भरुन तिथे घरात ठेवले. व मी मागच्या दरवाज्याने बाहेर निघुन मोटार सायकलने अजिंठा ता. अजिंठा जि. संभाजीनगर येथे जावून तिथे एका सोनार दुकानावर मोडून तिथून पैस घेवून परत पिंपळगाव हरेश्वर येथे घरी आलो होतो, अशी गुन्ह्याची कबुली दिली आहे. करीता संशयित आरोपी विशाल भोई, वय २२, रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा मा.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपा पोलीस अधीक्षक, जळगाव चार्ज चाळीसगाव, मा.श्री धनंजय येरुळे, उप विभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!