जळगाव जिल्हा

गलवाडे येथील ४३ वर्षीय इसम बेपत्ता.

पाचोरा-

गलवाडे येथील ४३ वर्षीय इसम हा बेपत्ता झाल्याची घटना घडली असून या बाबत पाचोरा पोलिसात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की,सोयगाव तालुक्यातील गलवाडे(ब)येथील रहिवासी नामे छोटू तुळशीराम गायकवाड (४३) हा इसम मी बाहेर जाऊन येतो असे घरी सांगून गेला असता दि.२५ सप्टेंबर २०२३ दुपारी ४ ते दि.२६ सप्टेंबर दुपारी २ वाजेच्या दरम्यान गलवाडे ते तारखेडा येथून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

या घटने बाबत दि.३ ऑक्टोबर रोजी बेपत्ता इसमाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली असून बेपत्ता इसमाचा वर्णन रंग गोरा असून नाक सरळ, केस काळे,डोळे काळे अंगात बदामी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट पायात चामडी चप्पल व उजव्या हातात जनार्दन स्वामी यांचे तांब्याचे कडे असे वर्णन असून सदर बेपत्ता इसम कुणास आढळून आल्यास पाचोरा पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक (०२५९६-२४०१३३) शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करीत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!