पाचोरा एसटी महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर; रणरणत्या उन्हात प्रवाश्यांवर पायी चालण्याची आली वेळ
पाचोरा-
पाचोरा एसटी महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर आलेल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
एसटी बस नेहमीप्रमाणे आज दिनांक 18 मे शनिवार रोजी देखील भर दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी पाचोरा तारखेडा दरम्यान फेल झाल्याने बस मधील प्रवाशी रणरणत्या उन्हात पाई चालताना दिसून आले, कुणी पायी कुणी दुसऱ्याला हाक देत तर कुणी बसच्या सावलीत बसून राहत फेल झालेल्या बसचा त्रास सहन केला. पाचोरा आगाराची बस पाचोरा ते नगरदेवळा येथे दुपारी 1 वाजता प्रवाशी घेऊन गेली असता नगरदेवळा येथून परतीचा प्रवास करीत असताना गाळण ते तारखेडा दरम्यान गेर तुटल्याने अचानक बंद पडली. प्रवाशांनी पर्यायी बसची मागणी केली असता पाचोरा बस आगारात बसत शिल्लक नसल्याबाबत कळविले गेले, तर प्रवाशांना पायी जाण्याचा सल्लाच आगारातर्फे देण्यात आला. तर यातील त्रस्त प्रवासी पायी चालताना तर कोणत्यातरी इतर वाहनांना हात देत निघाले, ज्यांकडे पर्याय शिल्लक नव्हता तर बंद पडलेल्या बसच्या सावलीचा त्यांनी आधार घेतला.
यावेळी बस चालक एस. एफ.सरदार तर चालक गोहिल हे देखील त्रस्त झालेले दिसून आले पण आगारातून कोणतीच मदत न मिळाल्याने व कोणताही इतर पर्याय नसल्याने हवालदिल झाले.
पाचोरा आगारातील बसेस या जुन्या व कामावर आलेल्या असून या रूटला नेहमीच नादुरुस्त बसेस पाठवून प्रवाशांची थट्टा केली जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले कारण प्रवाशांना बस मध्ये बसताना देखील वाहक व चालक नेहमीच सूचना देतात की सदर बस या नादुरुस्त आहेत आपल्या जबाबदारीने बसावे, बस व्यवस्थित चालेल, जाईल अन्यथा अर्ध्यातच बंद पडेल अशा सूचना नेहमीच देत असल्याचे या मार्गांवर नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी यावेळी सांगितले,
तरी आगार प्रमुखांसह वरिष्ठांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन उन्हाळ्याचे दिवस असल्याने अशी वेळ येऊ नये म्हणून तरी देखील प्रवाशांची वणवण थांबवण्यासाठी प्रयत्न करावे व सर्वच बसेस पुन्हा दुरुस्ती करूनच रस्त्यांवर उतरावाव्यात अशी मागणी होतांना दिसून आली.