क्राईमजळगाव जिल्हा

जळगाव! सौरभ ज्वेलर्स दुकानात दरोडा;दरोडेखोर कॅमेऱ्यात कैद.



जळगाव-

शहरातील सराफ बाजार येथील भवानी माता मंदिराजवळील सौरभ ज्वेलर्स दुकानात  दिनांक २० मे सोमवार रोजी पहाटे ४ ते ४:३० वाजेच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी चाकूचा धाक दाखवत अंदाजे ३०तोळे सोने ,६० ते ७० हजार रोख रक्कम असा मुद्देमाल जबरी लुटून नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
जळगाव शहरातील सराफ बाजारातील भवानी माता मंदिरासमोरील महेंद्र कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स दुकान आहे.  २० मे सोमवार रोजी पहाटे चार ते साडेचार वाजता ३ दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून अज्ञात ६ जण दुकानाच्या मागच्या बाजूने आले. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी मुख्य चॅनेल गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप कटरने कापले. त्यानंतर आत प्रवेश केला. त्यानंतर लाकडी दरवाजाचे छोट्याशा खिडकीतून आत गेले. त्या दुकानात दोन जण झोपलेले होते. या सहा दरोडेखोरांनी चाकूच्या धाक दाखवत शांत राहण्याचे सांगितले. त्यानंतर ३०० ग्रॅम वजनाचे सोने व ६० ते ७० हजार रुपये रोख रक्कम काढून घेतले
दरम्यान पोलिसांचा गस्तीच्या वाहनाचा आवाज आला, त्यामुळे त्यांना मिळालेला जेवढा आहे तेवढा मुद्देमाल घेऊन पसार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर कामगारांनी दुकानाचे मालक कोठारी यांच्याशी संपर्क साधून  माहिती दिली. महेंद्र कोठारी यांनी तातडीने शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले. दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते.
परंतु बाहेरचे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दुचाकीवर आलेले ६जण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. जवळपास ३००ग्रॅम वजनाचे सोने अंदाजे व ६०ते ७० हजार रोख रक्कम नेल्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच सहायक पोलीस निरीक्षक संदीप गावित यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!