पाचोरा तालुक्यात भरारी पथकांद्वारे कृषी केंद्रांची तपासणी मोहीम सुरू
पाचोरा-
पाचोरा शहरातील सर्व बियाणे विक्री केंद्रांवर बियाणे ,खते, कीटकनाशके गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकामार्फत सक्त तपासणी करून आढळून आलेल्या चुकांबाबत (त्रुटी) नोटीस काढण्यात आलेल्या असून दोन दिवसात समर्पक खुलासा न दिल्यास संबंधित विक्रेत्याविरुद्ध बियाणे कायद्यांतर्गत कारवाईचे प्रस्ताव जिल्हा स्तरावर सादर करण्यात येणार आहेत. तपासणी करण्यात आलेल्या कृषी विक्री केंद्रांमध्ये धनश्री कृषी केंद्र, संजय कृषी केंद्र संघवी कृषी केंद्र, परेश कृषी केंद्र, पारस कृषी केंद्र, गणेश कृषी केंद्र ,क्रांती ट्रेडर्स ,आदर्श कृषी केंद्र ,बालाजी कृषी केंद्र या मुख्य विक्रेत्यांचा समावेश होता त्यात आढळून आलेल्या त्रुटी त्यामध्ये दरपत्रक न लावणे, दर पत्रकावर अद्ययावत साठ्याची नोंद न करणे ,परवान्यामध्ये ऑनलाईन सिस्टीम मध्ये विक्री करत असलेल्या सर्व उत्पादकांच्या उगम प्रमाणपत्रांचा समावेश न करणे, साठा रजिस्टर अध्ययावत न ठेवणे तसेच प्राप्त बियाणे साठ्याच्या अहवाल तालुकास्तरीय कार्यालयास न देणे यासारख्या प्रमुख गंभीर त्रुटींचा खुलासा मागणी केलेला आहे. सदरची मोहीम तिन्हीही कृषी निविंष्ठांसाठी पूर्ण हंगामात नियमित सुरू राहणार आहे. तरी विक्रेत्यांनी दिलेले निर्धारित दरानुसारच विक्री करावे तसेच कोणत्याही बियाण्याची लिंकिंग करू नये ,आपल्याकडे उपलब्ध असलेल्या बियाण्याची शेतकरी मागणी प्रमाणेच विक्री करावे तालुक्यात याबाबत काहीही तक्रारी असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय पाचोरा व कृषी अधिकारी पंचायत समिती पाचोरा यांच्याकडे संपर्क करावा तसेच या भरारी पथकाच्या तपासणी टीम मध्ये अध्यक्ष रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी पाचोरा, एम एस भालेराव. कृषी अधिकारी पंचायत समिती पाचोरा सचिव ,श्री एस पी बोरसे सदस्य, आर.बी.चौधरी तंत्र सहाय्यक उपस्थित होते.