पेपरसाठी गेलेली २१ वर्षीय तरुणी कॉलेजमधून बेपत्ता
पाचोरा-
येथील एम. एम. कॉलेजमधून तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याबाबत पाचोरा पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनुसार, एम.एम. कॉलेजमध्ये सध्या एफवायबीए पेपर सुरू आहेत. दररोज विद्यार्थी पेपर देण्यासाठी येतात. २७ मे रोजी २१ वर्षीय तरुणीस तिच्या मामाने सकाळी ९:३० वाजता एम.एम. कॉलेजमध्ये परीक्षेला सोडले. दुपारी दीडला मामा परत घेण्यासाठी एम.एम. कॉलेजमध्ये गेला. पेपर सुटल्यानंतर तरुणी आढळली नाही. कॉलेज परिसर व नातेवाईकांकडे ही शोध घेण्यात आला. मात्र तरुणी आढळून आली नाही. अखेर पाचोरा पोलिस स्टेशनला धाव घेऊन मिसिंग दाखल करण्यात आली आहे. बेपत्ता तरुणीची उंची ५ फूट, रंग गोरा, डोळे व केस काळे, चेहरा गोल, अंगात अबोली रंगाचा टॉप व पांढरी लेगीज, चप्पल असे वर्णन आहे. या वर्णनाची तरुणी आढळून आल्यास पाचोरा पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र बत्तीसे करीत आहे.