10 वर्षे जुनं असलेलं आधार कार्ड अपडेट केलं नाही तर बंद होणार?
भारतातील जवळपास सर्व नागरिकांकडे आपले आधार कार्ड आहे. आधार कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. बँक असो किंवा सरकारी कार्यालय असो सर्वच ठिकाणी आधार कार्डचा वापर करण्यात होतो त्यामुळे आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पण तुमचे आधार कार्ड 10 वर्षे जुने असेल तर तात्काळ अपडेट करा. कारण, आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 4 जून पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. पण 10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट केले नाही तर ते बंद होईल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. जाणून घ्या याबाबत UIDAI ने काय म्हटलं आहे.
10 वर्षे जुने आधार कार्ड हे अपडेट करणे अनिवार्य आहे. मात्र, याच दरम्यान सोशल मीडियात अनेक मेसेजेस येत आहेत की, 10 वर्षे जुने आधार कार्ड 14 जून पर्यंत अपडेट केलं नाही तर ते बंद होईल. यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न येत आहेत.
UIDAI ने सांगितले की, 10 वर्षे जुने आधार कार्ड पूर्णपणे वैध राहणार आहेत. आधार कार्डच्या संदर्भात सोशल मीडियात अनेक फेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. आधार कार्ड वैध राहतील असे UIDAI ने स्पष्ट केले आहे. आधार कार्ड अपडेटची तारीख 14 मार्च होती नंतर ही तारीख वाढवून 14 जून करण्यात आली आहे.
14 जून 2024 पर्यंत नागरिक आपली आधार संदर्भातील माहिती ऑनलाईन माध्यमातून मोफत अपडेट करु शकतात. ज्या नागरिकांना आधार केंद्रावर आपली माहिती अपडेट करायची आहे त्यांना शुल्क द्यावे लागेल. म्हणजेच जर तुम्हाला आपला मोबाईल नंबर आधारसोबत लिंक करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाल शुल्क भरावे लागेल.
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता?
तुम्हाला आपल्या आधार कार्डमधील माहितीत ऑनलाईन बदल करायचा असेल तर त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. यामध्ये पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, मार्कशिट, मॅरेज सर्टिफिकेट, रेशन कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, रेसिडेंट सर्टिफिकेट, लेबर कार्ड, जन आधार या कागदपत्रांचा समावेश आहे.
आधारकार्ड अपडेट असे करु शकतात
सर्वप्रथम https://ssup.uidai.gov.in/ssup/ या लिंकवर क्लिक करा. यानंतर लॉग ईन बटणावर टॅप करा.
मग तुमचा 12 अंकांचा यूनिक नंबर आणि कॅप्चा अॅड करा
मग नेक्स्टवर टॅप करुन सेंड ओटीपी करा.
तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल. हा ओटीपी नंबर फिल करा.सर्व्हिस टॅबमध्ये अपडेट आधार ऑनलाईनवर टॅप करा.प्रोसिड करा आणि आपल्याला जी माहिती अपडेट करायची आहे त्या ऑप्शनवर क्लिक करा.आवश्यक असलेले कागदपत्र अपलोड करा.