ट्रॅक्टर पलटी होवुन दबलेल्या ४० वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू.
पाचोरा-
पाईप लाईनसाठी खोदलेल्या खड्डयात ट्रॅक्टर उलटला. यात गंभीर जखमी चालक अनिल बाबुलाल तडवी (वय ४०, रा. आर्वी, ता.पाचोरा) याचा मंगळवार, २८ रोजी रात्री नऊ वाजता उपचार घेताना उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात मृत्यू झाला.
पिंप्री (ता.पाचोरा) रस्त्यावरुन ट्रॅक्टर नेत असताना खड्क्यात तो उलटला. वाहनाखाली सापडलेला चालक अनिल तडवी गंभीर जखमी झाला होता. ही घटना मंगळवार, २८ रोजी सकाळी आठ वाजता घडली. प्रत्यक्षदर्शीनी जखमी अनिल तडवी याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर अधिकच्या उपचारासाठी त्याला
जळगाव येथे हलविण्यात आले होते.
डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दरम्यान बेशुध्दावस्थेतील जखमी चालकाकडून उपचाराला प्रतिसाद मिळू न शकल्याने रात्री ९ वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खबरीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार, २९ रोजी मयताच्या !कुटुंबियांसह नातेवाईकांना शोक अनावर झाला. पोलिस पंचनामा तसेच शवविच्छेदन होवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चता पत्नी, दोन मुले, आई वडील तसेच तीन भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, पिंप्री गावालगत विनापरवाना खड्डे खोदून ठेवले असल्याने अनेक ग्रामस्थांना त्याचा त्रास झाला आहे. या खड्ड्यांनी आज आमच्या कुटुंबातील तरुण कर्ता पुरुष हिरावून नेला आहे. हे खड्डे कुठलीही परवानगी न घेता खोदणाऱ्या ठेकेदार व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.