पाचोर्यात कडधान्य क्षेत्र विस्तार मोहीम 2024 अंतर्गत कार्यशाळा संपन्न
पाचोरा-
मा. जिल्हाधिकारी जळगाव, आ. आयुषजी प्रसाद यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून कडधान्य क्षेत्र विस्तार मोहीम 2024 संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आह. या मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक 31 मे 2024 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आ. कुरबान तडवी साहेब उपस्थित होते. सोबतच कृषी विकास अधिकारी सुरज जगताप , उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, तालुका कृषी अधिकारी भडगाव परेश बागले, श्री. एम. एस. भालेराव कृषी अधिकारी पंचायत समिती पाचोरा, महाबीज पाचोरा व्यवस्थापक श्री संजय देवरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा रमेश जाधव यांनी केले.
यावेळी कडधान्य क्षेत्र विस्तार मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेले पोस्टर,तसेच बीज प्रक्रिया ची माहिती असलेले पोस्टर व तूर, मूग उडीद व सोयाबीन पिकाची लागवड याबाबतची माहिती पुस्तिका याचे विमोचन देखील करण्यात आले.
महाबीज पाचोराचे व्यवस्थापक श्री. संजय देवरे यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व सर्व उपस्थित त्यांना पटवून दिले व त्याबाबत जनजागृती करणे बाबत आवाहन केले.
यावेळी जिल्हा गुणवंता नियंत्रण निरीक्षक श्री विकास बोरसे यांनी खते बियाणे व कीटकनाशके कायदे अंतर्गत असलेल्या तरतुदींची जाणीव सर्व उपस्थित कृषी निविष्ठा विक्रेते यांना करून दिली.
कृषी विकास अधिकारी श्री सुरज जगताप यांनी कपाशी पिकामध्ये तुर , मूग व उडीद या पिकांची लागवड करून उत्पादनात कशाप्रकारे वाढ होऊ शकते, तसेच उत्पादन खर्च व खतांची कशी बचत होते याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच कृषी निवेष्ठा विक्रेते यांनी बियाण्याची विक्री ही शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणेच करण्यात यावी, कुणीही जादा दराने विक्री करू नये व तसे आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर पोलीस गुन्हे दाखल करण्यात येतील व त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील याबाबत सक्त ताकीद दिली. जिल्हास्तरावर 24 तास बियाणे उपलब्ध व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असले बाबत त्यांनी माहिती दिली.
मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कुर्बान तडवी साहेब यांनी कपाशीमध्ये तुर, मूग उडीद यासारख्या कडधान्य पिकांची लागवड करणे बाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून प्रोत्साहित करणे बाबत आवाहन केले. तसेच मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी कपाशीमध्ये तूर मूग व उडीद यांचे आंतरपिक घेणे बाबतचे दोन व्हिडिओ क्लिप्स प्रसारित केले असून, गावातील शेतकरी, व्हॉट्स ॲप ग्रुप तसेच नातेवाईक यांना व्हाट्सअप द्वारे पाठवून या कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढविणे बाबत सर्व उपस्थिततांना आवाहन केले.
तसेच यावेळी सोयाबीन उगवण शक्ती, बीज प्रक्रिया याबाबतचे माहिती देणारे स्टॉल लावण्यात आलेले होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ईश्वर देशमुख कृषी अधिकारी पंचायत समिती भडगाव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री रमेश जाधव उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा यांनी केले.