विजयाचा आनंदोत्सव संपताच अमोल शिंदे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर;वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या नुकसानीची केली पाहणी
पाचोरा-
काल लोकसभेचे निकाल जाहीर झाले त्यामध्ये जळगांव लोकसभेत भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यानिमित्त पाचोरा येथे अमोल शिंदे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यासह आनंदोत्सव साजरा केला.परंतू सायंकाळी काही भागांत वादळी वाऱ्यासह मोठया प्रमाणावर पाऊस झाला ह्या वादळी वाऱ्यामुळे केळी व काही फळ पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे भाजपाचे अमोल शिंदे यांनी आज नगरदेवळा व नगरदेवळासीम या शिवारांत थेट शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
तेथून स्थानिक प्रशासनाला संपर्क करत तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना मदत मिळवुन द्यावी अशी प्रशासनासोबत चर्चा केली.व शेतकऱ्यांना धीर दिला तसेच शेतकरी अत्यंत संकटात सापडले असून तयार झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे.व केळी घड कापणीला आलेली झाडे वाऱ्यामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. व शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला पिकाचा घास हिरावुन घेतला गेला आहे. व पाचोरा-भडगांव तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी त्यांचा पुत्र शेतकरी पुत्र म्हणून मी सदैव त्यांच्या सोबत असेल असे त्यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले.