बाजोरीया मिल येथे चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत; पाचोरा पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी.
पाचोरा-
पाचोरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील बाजोरीया मिल येथे सुरक्षा रक्षकास मारहाण करुन जबरी चोरी करणा-या आरोपीतांना गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक करुन गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे
पाचोरा पोलीस ठाणे हददीतील फिर्यादी नामे आशिष जगदिश बाजोरीया, वय. 48 वर्षे, रा. हिंद ऑईल मिल, देशमुखवाडी, पाचोरा, जि. जळगांव यांनी फिर्याद दिली की, दिनांक 23/07/2023 रोजी पहाटे 03.30 वा. चे सुमारास ऑईलमिल, बाजोरीया ऑईल रिफायनरी व कृषक धान्य व्यापार फॅक्टरी ऑफिस, मोंढाळा रोड, पाचोरा, जि. जळगांव येथे सुरक्षा रक्षक म्हणुन प्रभाकर रामदास पाटील, वय. 61 वर्षे, रा. सारोळा, ता. पाचोरा. जि. जळगांव यांस अनोळखी तिन चोरटे यांनी येवुन सुरक्षा रक्षक याचे हात पाय बांधुन त्यास चाकुचा धाक दाखवुन त्यांनी 1.4,05,000/- रुपये रोख रक्कम त्यात 500 रुपये दराच्या चलनी नोटा 2. 5,000/-रुपये किंमतीचे गोदरेज कंपनीची तिजोरी 3. 1,000/-रुपये किंमतीचे सोनेरी रंगाचे भिस्कीटे पेपर वेट म्हणुन वापरायचे 4. 6,000/-रुपये किंमतीचा डी.व्ही.आर मशीन 5. 1,000/-रुपये किंमतीचा मोबाईल असा एकुण 4,18,000/-रुपये किमतीचा मुददेमाल हा फिर्यादीचे संमतीशिवाय लवाडीचे इराद्याने बळजबरीने हिसकावुन घेवुन गेले बाबत पाचोरा पोलीस स्टेशन गु.रजि.क्रमांक 267/2023 भादवि कलम 394, 458, 34 प्रमाणे दिनांक 23/07/2023 रोजी 12.36 वा. दाखल आहे.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटी करण पथकाचे अंमलदार पोहेकॉ/625 राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ/1230 योगेश सुरेश पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण करुन तसेच त्यांना त्यांचे गुप्तबातमीदारां मार्फत संशयीत आरोपी हे त्यांचे घरी आलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सदर माहिती मा. पोलीस निरीक्षक सो, श्री. अशोक पवार यांना कळवुन त्यांचे परवानगीने आरोपी नामे अल्ताप मसुद खान, वय.31 वर्षे, रा. नुराणीनगर, जारगांव, ता.पाचोरा, जि. जळगांव 2. सरफराज हसन शहा फकीर, वय. 22 वर्षे, रा. मुल्लावाडा, जामनेर रोड, पाचोरा, जि. जळगांव यांना विचारपुस करुन त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयात त्यांचा साथीदार हा गुन्हा घडले पासुन फरार आहे. सदर वरील दोन्ही आरोपींनी गुन्हयात वापरेलेले 1. पिस्टल सारखे दिसणारे लायटर 2. एक 12.5 इंच असणारा सुरा (चाकु) व गुन्हयात गेलेले रोख 50,000/-रु. रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक सो, चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी सो, श्री. धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार, पोउपनिरी/श्री. प्रकाश चव्हाणके, पोहेकॉ/625 राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ/1230 योगेश सुरेश पाटील यांनी पार पाडली आहे.