केळी पिकाचे वादळी वाऱ्याने नुकसान;अखेर माजी खासदार उन्मेश दादा पाटील व करण दादा पाटील यांनी घेतली शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल.
जळगाव-
जळगाव जिल्ह्यातील विशेषता जळगाव व धरणगाव तालुक्यातील काही भागात दिनांक ७ जुन २०२४ रोजी मध्यरात्री वादळी वाऱ्याने केळी व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला व विमा कंपनीला विनंती केली असता उडवा – उडविचे उत्तर मिळत होती. कुणीही शेतकऱ्यांच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देत नव्हते.
यानंतर शेतकऱ्यांनी माजी खासदार उन्मेश पाटील व करण पाटील यांना आज दिनांक ८ रोजी सकाळी ७:३० वाजता दूरध्वनीद्वारे संपर्क करून झालेल्या नुकसानी बाबत माहिती दिली असतात तात्काळ माजी खासदार उन्मेश पाटील व करण पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ,कुर्बान तडवी साहेब, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी राहुल पाटील यांच्या समय संपर्क साधून तात्काळ ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने प्राप्त तक्रारी नुसार पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून शेतकऱ्यांनी देखील आपल्या झालेल्या नुकसानीची माहिती तात्काळ ७२ तासाच्या आत ऑनलाईन पद्धतीने विमा कंपनी किंवा ऑफलाइन पद्धतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करण्यात बाबतचे आव्हान माजी खासदार उन्मेश पाटील व करण पाटील यांनी केले आहे.