जळगावहून मुंबईला विमानाने जाण्यासाठी लागणार 3440 रुपये.
जळगाव-
केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत मुंबई-जळगाव-मुंबई या विमानसेवेला 20 जूनपासून अधिकृतपणे सुरुवात होत आहे. ‘अलायन्स एअर’ या विमान कंपनीकडून सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस ही विमानसेवा चालविण्यात येणार आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेमके किती भाडे मोजावे लागेल, त्याचीही माहिती आता उपलब्ध झाली आहे. साधारण सव्वातासात कोणीही आता जळगावहून मुंबईला विमानाने पोहोचू शकणार आहे.
जळगावहून पुणे, गोवा, हैदराबादसाठी यापूर्वी सुरु झालेल्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस गुरूवारी आणि शुक्रवारी जळगावहून मुंबईसाठी विमान उड्डाण घेणार आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार गुरूवारी सायंकाळी 6.45 वाजता मुंबईहून विमान उड्डाण घेईल आणि रात्री 8.05 वाजता जळगावला पोहोचेल. त्याच दिवशी रात्री 8.30 वाजता विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने झेपावेल आणि 9.45 वाजता पोहोचेल.
तिकिटाचा दर सध्या 3440 रूपये असणार शुक्रवारी मुंबईहून सायंकाळी 6.35 वाजता विमान उड्डाण घेईल आणि रात्री 7.55 वाजता जळगावला पोहोचेल. त्याच दिवशी रात्री 8.30 वाजता पुन्हा मुंबईकडे विमान झेपावेल आणि 9.35 वाजता पोहोचेल. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी ‘अलायन्स एअर’ या विमान कंपनीकडून आपल्या अधिकृत वेबसाईटवर आगावू तिकीट विक्री सुरू करण्यात आली आहे.
तिकिटाचा दर सध्या 3440 रूपये इतका आहे.