समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजय निकम राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
बुलढाणा-
बुलढाणा जिल्ह्यातील ऋणानुबंध समाज विकास संस्था – तुकाराम आश्रय वृद्धाश्रम , सुलोचना माहेरघर ( महिला आश्रम) लताई बाल अनाथालय भोकर ता. चिखली जिल्हा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा मान सन्मान आणि कर्तुत्वाचा २०२४ या वर्षीचा “बहुजनरत्न जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार समता सैनिक दलाचे राज्य संघटक विजय निकम यांना जाहीर झाला.आपल्या सामाजिक आंदोलन च्या माध्यमातून विजय निकम यांनी शोषित, वंचित, पिडीत, शेतकरी कष्टकरी कामगार, गोरगरीब मजूर यांच्या व्यथानां वाचा फोडली आहे. सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय बहुजन रत्न सोहळा २०२४ बहुजन महापुरुषांच्या विचारावर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तिंना सदर पुरस्कार देण्यात येतो, बहुजन चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत आलेल्या, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उतुंग कामगिरी करुन बहुजन समाजाच्या कल्याणासाठी सतत धडपड करत असणाऱ्या संघर्षातून मोठे यश मिळवणाऱ्या व्यक्तींची बहुजन रत्न जिवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली जाते, विजय निकम यांनी सामाजिक क्षेत्रात खंबिरपणे उत्तुंग कामगिरी केली असता.
त्यांची बहुजन समाजाचे कल्याणासाठी सतत धडपड चालू आहे.संघर्षातून मिळालेल्या याच दैदिप्यमान यशा बद्दल निवड समितीने विजय निकम यांची राज्यस्तरीय” बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.आणि सदरचा सन्मान सोहळा दिनांक 9 जून 2024 रोजी चिखली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. सन्मान सोहळ्याचे उद्घाटन माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन म्हणून मंत्रालयात सचिव या पदावर कार्यरत असणारे सिद्धार्थ खरात, विद्याधर महाले ,माजी आमदार राजेंद्र बोन्द्रे यांची उपस्थिती होती. ह.भ.प धर्मकीर्ती महाराज प्रसिद्ध समाज प्रबोधन कीर्तनकार यांच्या हस्ते विजय निकम यांचा सन्मान करून त्यांना राज्यस्तरीय बहुजन रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. विजय निकम यांचे राज्य भरातून विविध क्षेत्रातील मान्यवर,मित्र ,कार्यकर्ते, सहकारी यांच्या कडून अभिनंदन व कौतूक केले जातं आहे. या सन्मान सोहळ्याचे आयोजन बुलढाणा जिल्ह्यातील ऋणानुबंध समाज विकास संस्था – तुकाराम आश्रय वृद्धाश्रम , सुलोचना माहेरघर ( महिला आश्रम) लताई बाल अनाथालय भोकर ता. चिखली जिल्हा बुलढाणा यांच्या संयुक्त प्रशांत भैया डोंगरदिवे,अँड.सी पी इंगळे, प्रा. डॉ सुभाष राऊत, इजि.एन के सरदार, एस.एस गवई, संस्थेच्या अध्यक्ष लता अविनाश डोंगरदिवे व समस्त संस्थेचे पदाधिकारी यांनी केले होते.