शिवव्याख्याते खान्देश पुत्राचे दिल्ली महाराष्ट्र सदनात दोन दिवस व्याख्यान
पाचोरा-
तालुक्यातील वाडी-शेवाळे येथील मुळरहिवाशी (ह.मु.पाचोरा आशिर्वाद ड्रिमसिटी) येथील वनश्री पुरस्कार प्राप्त डिगंबर नथ्थू पाटील (डिगा बाबा) यांचे सुपुत्र पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सरदार एस.के.पवार हायस्कूलचे गणित-विज्ञान विषयाचे उपशिक्षक सचिन डिगंबर पाटील (मो.नं.7588814772 / 9226574867) हे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्याआई होळकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीआई फुले यांच्यासह विद्यार्थ्यांच्या विविध अंगी विकास होण्याच्या दृष्टीने त्यांना प्रेरणादायी वाटेल असे व्याख्याते म्हणून प्रसिध्द आहेत. आजपर्यंत त्यांचे महाराष्ट्रासह गुजरात,मध्यप्रदेश,छत्तीसगड या राज्यांमध्ये 1500 च्या जवळपास व्याख्यान झाले आहे.
दिनांक 20 व 21 सप्टेंबर हे दोन दिवसीय व्याख्यान भारताची राजधानी दिल्ली येथील कोपर्निकस मार्ग महाराष्ट्र सदनात सायंकाळी 7.00 वाजता आयोजित केले आहे. विशेष बाब म्हणजे दिल्लीतील मराठी बांधवांसाठी सदरचा कार्यक्रम नि:शुल्क राहणार असून प्रथम चार रांगा VVIP साठी राखीव असल्याचे आयोजकांकडून घोषित करण्यात आले आहे. दिनांक 20 सप्टेंबर रोजी हसु आणि आसु तर दिनांक 21 सप्टेंबर रोजी शिवराय डोक्यावर नव्हे तर डोक्यात घ्या अशा दोन विषयावर खास गणेश उत्सवानिमित्त महाराष्ट्र सदनात सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.