पाचोरा पोलीस स्टेशन चे राहुल बेहेरे यांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव
पाचोरा-
पाचोरा येथील पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस व विद्रुप दिसणारा बेवारस मनोरुग्ण व्यक्ती जो वाहनांवर दगड भिरकावत असे तसेच वाहनांना आडवे येणे व भीतीदायक हावभाव करीत असतांना पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक राहुल साहेबराव बेहेरे यांना दिसून आला असता त्यांनी त्याचे वारसांचा शोध घेतला मात्र मिळून आले नाही म्हणून त्यास मानव सेवा तीर्थ आश्रम वेले ता. चोपडा येथे दाखल करुन चांगली कामगिरी पार पाडल्याने राहुल बेहेरे यांनी केलेल्या . प्रशंसनीय कामाबद्दल पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचे हस्ते प्रमाणपत्र देत अभिनंदन करीत गौरविण्यात आले.
आपण केलेल्या सेवेचा महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटतो. आपण भावी काळात असेच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावित राहाल व महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकाल, अशी मला खात्री असल्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी म्हणाले याकरिता हे प्रशंसापत्र देण्यात येत आहे असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले. यावेळी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक नरेंद्र नलावडे हे देखील उपस्थित होते.