शासनाने शिक्षकांची भरती तात्काळ करावी-अनिल येवले यांनी केली मागणी.
पाचोरा-
राज्य सरकारने येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठीच्या विविध सुविधा जाहीर केल्या आहेत. यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच शालेय गणवेशाचे कापड विद्यार्थ्यांना पुरवले जाईल व बचत गटाच्या माध्यमातून गणवेश शिवून मिळेल असे धोरण शासनाने जाहीर केले असले तरी कोणत्याही शाळेकडून अद्याप गणवेशाचे कापड पुरवण्या संदर्भातील कार्यवाही होताना दिसत नाही. तसेच विद्यार्थ्यांना एस टी पास शाळेतच मिळण्याचे शासनाचे धोरण यशस्वी होईल असे सध्या तरी चित्र दिसत नाही. त्यासोबतच दर शनिवारी ‘नो दप्तर डे ‘ पाळण्या संदर्भात शिक्षण विभागाने आदेशित केले आहे. शनिवारी अभ्यासाऐवजी खेळ , योगा ,चर्चासत्र असे कार्यक्रम घेण्यात येणार असले तरी हे धोरणही यशस्वी होईल असे दिसत नाही.
एकंदर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे दरवर्षी वाढत असल्याने शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात अडचणी निर्माण येतात. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे भरण्या संदर्भात शासनाने त्वरित कार्यवाही करावी.
अनिल (आबा) येवले
(सामाजिक कार्यकर्ते , पाचोरा)