उत्राण येथे योग शिबीर उत्साहात संपन्न
उत्राण ता.एरंडोल
महाराष्ट्र राज्य महा एन.जी.ओ. फेडरेशन व शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबीर तसेच प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योग प्रशिक्षक श्री.अशोक चौधरी यांनी योग प्रात्यशिक करून योगा चे महत्व पटवून सांगितले तसेच अमोल महाजन यांनी सदर कार्यक्रमात योग दिनाबद्दल माहिती दिली सदर कार्यक्रम प्रसंगी एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन, माजी सरपंच विनोद महाजन, माजी उपसरपंच योगेश महाजन, विकासो संचालक विलास महाजन, संस्था अध्यक्ष अमोल महाजन, पोलीस पाटील राहुल महाजन, भाजपा एरंडोल तालुका उपाध्यक्ष व पत्रकार प्रकाश कुवर, संस्थेचे संचालक सागर महाजन, प्रमोद महाजन, योग प्रशिक्षक अशोक चौधरी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सैंदाने सर व सर्व शिक्षक आणि शिक्षिका तसेच गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन पाटील सर यांनी करून आभार मानले.