श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे जागतिक योगा दिवस उत्साहात संपन्न
पाचोरा-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दिनांक 21 जून रोजी सकाळी 7:15 वाजता जागतिक योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला गो.से. हायस्कूलमधील योगा शिक्षक डी.डी. कुमावत यांनी योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच योगाचे विविध आसन व त्यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
याप्रसंगी उपस्थित असलेले तालुका गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब समाधान पाटील व योगाशिक्षक डी.डी.कुमावत यांचा मुख्याध्यापिका सौ.पी. एम.वाघ यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.
जवळपास 1000 विद्यार्थी 65 शिक्षक व 50 पालकांनी या योगा दिवसांमध्ये सहभाग घेतला.याप्रसंगी शाळेचे उप मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे , पर्यवेक्षक आर. एल.पाटील ,पर्यवेक्षिका सौ. ए.आर.गोहिल , सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे यांनी केले. तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.