सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची बुलढाणा, वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर व आढावा बैठक संपन्न
बुलडाणा-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर येथे सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंडित कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई व सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कुणाल माने तसेच सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राजेशजी गवई यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक, व विविध पदावरती नियुक्तियां तसेच सत्कार समारंभ पार पडला. यावेळी मेहकर तालुका अध्यक्ष दुर्गादास अंभोरे, मेहकर तालुका कार्याध्यक्ष देवानंद अवसरमोल, चिखली तालुका कार्याध्यक्ष व सोशल मिडीया प्रमुख राधेश्याम खरात, मेहकर तालुका उपाध्यक्ष सचिन गवई, मेहकर शहर अध्यक्ष रमेश गवई, वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष संदिप राऊत, रिसोड तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण शेटाने, तसेच महिला आघाड़ी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीताई कस्तुरे, बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष निताताई पैठणे, मेहकर शहर अध्यक्ष कांचन मोरे यांनी पक्ष बळकटीसाठी,मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे ही सर्वसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी आणी मा.शरदचंद्र पवार साहेब यांचे उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे विचार कृतीत उतरविण्यासाठी मेहकर येथे मान्यवरांच्या हस्ते नियुक्तियां करण्यात आल्या यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे व सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडुन सर्वाना शुभेच्छा देण्यात आल्या. व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना सर्व स्तरावरुण अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..