आषाढी एकादशी निमित्त कृष्णापुरी येथील पायी दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान

पाचोरा-
पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील विठ्ठल मंदिराच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून काढण्यात येणारी पंढरपूर पायी दिंडी आज दिनांक 24 जून 2024 सोमवार रोजी सकाळी विठुरायाचा जयघोषात मार्गस्थ झाली. ह.भ.प. गोविंदजी महाराज वरसाडेकर यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल मंदिरात पूजा,आरती व पादुका पूजन करून दिंडी निघाली.या दिंडीत शहर व तालुक्यातील महिला व पुरुष भाविक वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.भडगाव रोड भागातील कैलादेवी मंदिरात दिंडीचे स्वागत करण्यात आले. डॉ अनिल देशमुख निर्मला देशमुख,प्रा.सी.एन.चौधरी,
मा.नगरसेवक संजय बापू एरंडे,जगदीश भाईसाब अग्रवाल, यांच्या हस्ते हरिभक्त परायण गोविंद महाराज व प्रमुख ज्येष्ठ वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिंडीचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.गोविंद महाराज चौधरी यांच्या हस्ते दिंडीच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या डॉ अनिल देशमुख ,ह.भ.प.योगेश महाराज , चंद्रकांत शेलार , प्रा.सी.एन. चौधरी , जगदीश अग्रवाल यांना नारळ देऊन सन्मान करण्यात आला.दिंडीत सहभागी वारकऱ्यांना बटाटे चिवडा व राजगिऱ्याचा लाडूचे फराळ देण्यात आले. याप्रसंगी टाळ , मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी पुढे निघाली .ही दिंडी 19 दिवसात आषाढी एकादशीच्या दोन दिवस अगोदर पंढरपूर येथे पोहोचणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी संजय बापू एरंडे यांच्या वतीने पंढरपूर येथे सर्व भाविकांना साबुदाण्याची खिचडी फराळ देण्यात येते. हीअन्नदान सेवेची परंपरा मा. नगरसेवक संजय बापु एरंडे यांनी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून जोपासली आहे.