जो पर्यंत शेतकरी हिताचा निर्णय होत नाही,तो पर्यंत सभेतील विषयांना माझा विरोध राहील- डॉ. निळकंठ पाटील
पाचोरा-
गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक , वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर निळकंठ पाटील यांनी पत्रकार परिषद घेवुन, पाचोरा बाजार समितीमध्ये भाजीपाला लिलाव सकाळी 5 वाजता सुरू करण्याची मागणी सभापती यांना निवेदनाद्वारे केली असल्या बाबत माहिती दिली होती,या अगोदर काही महिन्यांपूर्वी डॉ निळकंठ पाटील यांनी सभापती यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती की भाजीपाला लिलाव सकाळी 5 वाजता सुरू करण्याची, त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने भाजीपाला लिलाव सकाळी पाच वाजता सुरू केला होता,मात्र काही दिवसांपूर्वी डॉ.निळकंठ पाटील यांनी बाजार समिती मध्ये फरफेटका मारला असता सकाळी 2:30 वाजता लिलावाला भेट दिली असता,मध्य रात्री लिलाव सुरू असल्याचे आढळून आले, म्हणून जो पर्यंत शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय होत नाही, तो पर्यंत सभेतील सर्व विषयांना माझा विरोध राहिल,तसेच तो पर्यंत सभा भत्ता मी स्विकारणार नाही,तसेच दिनांक 29 जून शनिवार रोजी दुपारी 2 वाजता होणाऱ्या मासिक सभेच्या सर्व विषयांवरील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ निळकंठ पाटील यांनी बहिष्कार टाकला आहे.त्यांनी या बाबत एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.