राज्य

पोलीस भरतीत धावताना अमळनेर येथील तरुणांचा दुर्दैवी मृत्यू.

नवी मुंबई-

राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. 19 जून पासून पोलिस भरतीच्या मैदानी चाचण्या सुरु झाल्या आहेत. पोलीस दलात भरती होवून देशसेवा करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो तरुण अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी सुरु केली होती.

दरम्यान, अनेक मैदानी चाचणी उमेदवारांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागत असते. असाच एक प्रकार नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये घडला आहे. धावण्याची चाचणी सुरु असताना एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अक्षय बिऱ्हाडे असं मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. ही घटना शनिवारी 29 जून रोजी नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये घडली.

अक्षय बिऱ्हाडे हा 23 वर्षीय तरुण हा जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर येथील रहिवाशी आहे. नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमधील पोलीस भरती प्रक्रियेत तो सहभागी झाला होता. एस. आर. पी. भरती ग्रुप क्रमांक 11 या ठिकाणी धावपट्टीवर धावत असताना अक्षय अचानक मैदानात कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ त्याला कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्याम त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून अक्षयला हृदयविकाराचा झटका आला होता, की त्याने काही सेवन केले होते, याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकेल, असंही डॉक्टरांनी सांगितले.

अक्षय हा 500 मीटरचा टप्पा धावून पूर्ण करण्याच्या आधीच मैदानात कोसळला. त्याच्यावर वेळीच उपचार झाले नसल्याचा गंभीर आरोप नातेवाईंकांनी केला आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!