जळगाव जिल्हा

पाचोरा जैन पाठशाळेच्या अध्यक्षपदी प्रफुल्लकुमार संघवी यांची सर्वानुमते निवड;सर्वत्र अभिनंदन

पाचोरा-

शतकीय दैदिप्यमान गौरवशाली परंपरा लाभलेल्या दानशुरु शेट श्री.बछराजजी रुपचंदजी संघवी जैन पाठशाळा, पाचोरा या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी एमएसपी बिल्डकॉनचे तसेच साई इन्फ्राचे संचालक प्रफुल्लकुमार (पप्पू भाऊ) जवाहरलाल संघवी यांची दिनांक एक जून रोजी झालेल्या संस्थेच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पाचोरा जैन समाजाचे प्रमुख व्यक्तिमत्त्व रतनचंदजी संघवी, डॉ. जवाहरजी संघवी, किशोरजी संघवी, माजी अध्यक्ष बबलू संघवी,महेंद्र शेठ संचेती, कांतीलालजी श्रीमान, प्रफुल्लजी बांठीया, दिनेशजी बोथरा, मिलिंदजी संघवी, नितीनजी संघवी,जीवन जैन, प्रदीपकुमारजी संघवी यांच्यासह समाजातील सर्व बांधव उपस्थित होते. या निवडीबद्दल प्रफुल्लकुमार संघवी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांचे उल्लेखनीय काम असून पाचोरा तालुक्यासह जिल्ह्यात त्यांच्या नावाचा गवगवा असून संघवी यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्ये नव्या उंचीवर पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!