जळगाव जिल्हा

पाचोरा – भडगाव कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे शेतकऱ्यांसाठी ०१ जुलै पासून एक रुपयात पिक विमा भरण्याची सुविधा निशुल्क सुरु-सभापती गणेश भिमराव पाटील

पाचोरा-

नवीन खरीप हंगाम सुरु झालेला असून संभाव्य नैसर्गिक आपत्तीचे धोके पाहता शेतकऱ्यांनी कृषि मालाचा पिक विमा उतरवणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत शासनाची कृषि पिकांसाठी एक रुपयात पिक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेमार्फत शेतकऱ्यांना पिक विमा उतरवणे सुलभ व्हावे यासाठी  आमदार  किशोर  पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार” कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा-भडगाव तर्फे मुख्य कार्यालय पाचोरा येथे सन २०२४-२५ चा खरीप हंगामातील पिकांसाठी पिक विमा भरणा सुविधा केंद्र निशुल्क दरात मागील वर्षी प्रमाणे या वर्षी हि बाजार समिती मार्फत  १ जुलै २०२४ पासून सुरु करण्यात येणार आहेत. पिक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै-२०२४ पर्यंत आहे. पिक विमा भरण्यासाठी पिक पेरा असलेला ७/१२ उतारा, ८अ उतारा, आधारकार्ड, बँक पास बुक झेरॉक्स, स्वयंम घोषणा पत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे. तरी कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने सभापती गणेश भिमराव पाटील व उपसभापती  प्रकाश अमृत पाटील,  प्रकाश शिवराम तांबे,  युसुफ
भिकन पटेल,  सुनिल युवराज पाटील,  लखीचंद प्रकाश पाटील,  राहुल रामराव पाटील,  शामकांत अशोक पाटील,  विजय कडू पाटील,  राहुल अशोक संघवी या संचालकांनी
केले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!