जळगाव जिल्हा

किडनी विकाराच्या रुग्णांसाठी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये म.फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस सुविधेची सुरुवात.

पाचोरा-

पाचोरा येथे गेल्या पाच वर्षांपासून ‘सेवा आणि समर्पण’ या उदात्त हेतूने रुग्णसेवा करून प्रामाणिक व विश्वसनीय रुग्णसेवा सिद्धीस नेणाऱ्या “सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” मध्ये महात्मा ज्योतिराव फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेची सुविधा आता उपलब्ध झाली असून या योजने अंतर्गत किडनी विकार असलेल्या रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सुविधेची सुरुवात झालेली आहे.

डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील व बालरोग तज्ञ डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील यांच्या सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये जन आरोग्य योजनेअंतर्गत नवजात शिशु, बालकांपासून ते जेष्ठ नागरिकांनपर्यंत विविध आजारांवर मोफत उपचार आता सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे बालकांपासून ते वृद्धापर्यत श्वसनाचे आजार, दमा, निमोनिया, नवजात बाळांचे काचेच्या पेटीतील उपचार, मिरगीचे झटके, मेंदूचा जंतू संसर्ग, मेंदूत रक्तस्राव, विषबाधा, सर्पदंश, डेंग्यू, मलेरिया, हाडांचे ऑपेरेशन, हृदयविकार, पोटाचे, लिव्हरचे विकार अशा गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी व विश्वसनीय उपचार हे योजने अंतर्गत केले जात आहेत.

भडगाव रोड भागातील महाराणा प्रताप चौका जवळ ,गजानन पेट्रोल पंपा समोर, एस एस पाटील कन्ट्रक्शन कार्यालयाच्या वर असलेल्या ” सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” मध्ये जनहितार्थ सुरू करण्यात आलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या मोफत जन आरोग्य योजनांचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. स्वप्निल पाटील व डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील यांनी केले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!