क्राईमजळगाव जिल्हा

खडकदेवळ्यात भरदिवसा घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३० हजारांची रोकड लंपास

पाचोरा-

तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ३ लाख १० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम भानुदास तेली (वय ४८, रा. खडकदेवळा बु., ता. पाचोरा) हे कुटुंबीयांसह राहत असून, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराला लावलेले कुलूप तोडले. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून त्यातील दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याचे दागिने, मंगलपोत, अंगठी, कानचैन, झुमके, कामणी तसेच चांदीचे दोन पायजोडवे यांचा समावेश आहे. यासोबतच ३० हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्याने लंपास केली.

घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शांताराम तेली यांनी तत्काळ पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी ५ सप्टेंबर रोजी रात्री गुन्हा क्रमांक ४०८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ए) व ३३१(३) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे. चोरटा कोणत्या मार्गाने घरात शिरला आणि चोरीनंतर कोणत्या दिशेने पसार झाला, याचा तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!