राज्य

विशेष आषाढी रेल्वे व रेल्वे स्टॉपेज साठी मंत्री रक्षाताई खडसेंनी घेतली रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णवजी यांची भेट


भुसावळ-पुणे-भुसावळ नवीन रेल्वे सुरु करणे, रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत असणाऱ्या रेल्वे स्टेशनवर विविध एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देणे आणि आधी सुरु असलेल्या व कोविड कालावधीत थांबा रद्द केलेल्या गाड्यांना पुन्हा थांबा देणे बाबत, तसेच दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त अनआरक्षित मोफत
“विशेष आषाढी रेल्वे” साठी आज रेल्वे मंत्री श्री.आश्विनी वैष्णवजी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली.

जळगांव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नागरिक पुणे येथे स्थायिक असून, कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप असल्याने भुसावळ-पुणे रेल्वे सुरु करणे बाबत प्रवाश्यांची अनेक दिवसापासून मागणी होती, त्यानुसार सदर भुसावळ-पुणे-भुसावळ रेल्वे लवकर सुरु होणे, तसेच #बोदवड स्टेशन
येथे नवजीवन (12655/12656), सुरत-अमरावती
(20925/20926), आजाद हिंद (12129/12130),
#नांदुरा स्टेशन येथे हैद्राबाद-जयपूर सुपरफास्ट
(12719/12720), प्रेरणा एक्स्प्रेस (22137/22138),
गरीबरथ (12113/12114), #रावेर स्टेशन येथे महानगरी(22177/22178), #निंभोरा स्टेशन येथे अमृतसर एक्सप्रेस(11057/11058), #भुसावळ स्टेशन येथे राजधानी एक्सप्रेस टेक्नीकल हाल्ट (22221/22222) तर मलकापूर
स्टेशन येथे अमरावती एक्स्प्रेस (22117/22118), गरीबरथ (12113/12114) ई. गाड्यांना थांबा देणे बाबत तसेच माझ्या मार्फत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर जाणाऱ्या भक्तांसाठी दरवर्षी प्रमाणे दि.16 जुलै जाण्यासाठी व दि.17 जुलै परत येण्यासाठी भुसावळ-पंढरपूर-भुसावळ अनआरक्षित
मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडी उपलब्ध करण्यासाठी आज रेल्वे मंत्री श्री. आश्विनी वैष्णवजी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली. यावर तत्काळ योग्यती कार्यवाही करण्यात येईल असे रेल्वे मंत्री यांनी यावेळी आश्वासन दिले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!