नारीशक्ती दूत या ॲपवरून घरबसल्या करता येणार ‘लाडकी बहीण’ योजनेचा अर्ज
मुंबई-
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने महिलांना दर महिन्याला १५०० रूपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आहे. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे. ही योजना जाहीर झाल्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे बंद असलेले लाडली बहीण योजनेचे ऍप सुरू झाले आहे. नारीशक्ती दूत असे या ऍपचे नाव असून ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. लाडली बहीण योजनेच्या ऍप मध्ये अद्यापही उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम सुरू आहे. मात्र येत्या दोन दिवसात ते अपडेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरबसल्या या योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. त्याशिवाय तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी आता उत्पन्न दाखल्याऐवजी रेशन कार्ड आणि रहिवासी दाखल्याऐवजी आधारकार्डचा वापर करता येणार आहे.