आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते पुनगांव येथे वृक्षारोपण
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील पुनगांव येथे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून पुनगांव ग्रामपंचायत व सरस्वती फाऊंडेशन पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने पुनगांव ग्रामपंचायत परिसरात सुमारे पाचशे झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यात सरस्वती फाऊंडेशनचे अध्यक्ष रविंद्र राजपूत हे शंभर झाडे व स्ट्रीगाड, देणार आहेत, दोनशे झाडे पुनगांव जिल्हा परिषद शाळा तसेच, मांडकी जिल्हा परिषद शाळा परिसरात लावण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने झाडे पुरवण्यात आली आहेत,तर एकशे एक बेलाची झाडे गावातील राजेंद्र मोतीलाल परदेशी,तर वीस लिंबाची झाडे व वीस स्ट्रीगार्ड उपसरपंच अनिल परदेशी उपलब्ध करून देणार आहेत. उर्वरित झाडे ग्रामपंचायतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमास गावकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.यावेळी आमदार किशोर पाटील यांच्या सह सरस्वती फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र राजपूत, पुनगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुनिता चिंतामण पाटील, उपसरपंच अनिल परदेशी, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद गुजर, अनिल पाटील,मनोज मोरे, शिवलाल मोची आबा सोनवणे, नारायण मोची, विकास सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद पाटील, संचालक, सिताराम पाटील, बाजीराव पाटील, वृक्षसंवर्धन समितीचे पदाधिकारी चिंतामण पाटील, नवीन गुजर,दिपक सुरवाडे पोलीस, प्रदिप परदेशी पोलीस,,नटू परदेशी, संदिप परदेशी, संजय ब्राह्मणे, शरद कोळी,यांच्या सह जिल्हा परिषद शाळा पुनगांव चे मुख्याध्यापक पाचोळेसर, अनिल वराडे, महाले, राजपूत, शारदा पाटील, शितल महाजन व मांडकी शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव सुरवाडे, जयवंत पाटील,माजी सरपंच प्रविण अप्पा पाटील, पोलीस पाटील प्रवीण ठाकूर, , ग्रामसेवक विकास पाटील, सेक्रेटरी सुनील पाटील, सरस्वती फाऊंडेशनचे रविंद्र राजपूत, दिपक पाटील,व टिम, सामाजिक वनीकरण विभागाच्या परिक्षेत्र अधिकारी सरिता पाटील, प्रकाश पाटील, कृषी सहायक जाधव, कृषी सहायक संगिता पाटील मॅडम, अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा सेविका,यांच्या सह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
गावातील एकशे एक महिलांना बेलाची झाडे देण्यात येणार आहे,व जी महिला त्या झाडाचं संगोपन करुन वाढवेल त्या कुटूंबाला ग्रामपंचायत घरपट्टीत दहा टक्के सूट देण्यात येईल असे आश्वासन सरपंच सौ सुनिता चिंतामण पाटील यांनी दिले आहे.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना आमदार किशोर पाटील यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले, पुनगांव ग्रामपंचायतीने वृक्षारोपणाचा घेतलेला निर्णय अतिशय छान संकल्पना घेऊन गावात वृक्षारोपण करण्यासाठी एक पाऊल टाकले आहे, दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान व पर्यावरणाचा र्हास हा अशा वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन केल्याने थांबेल असे सांगितले. एक विकास काम कमी करा पण वृक्षारोपण करून ती झाडे शंभर टक्के जगवा असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले. .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल वराडे यांनी तर प्रास्ताविक चिंतामण पाटील यांनी व आभार विकास पाटील ग्रामसेवक यांनी मानले.