जळगाव जिल्हा
26 जुलै पाचोरा भडगाव रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ;उपस्थित राहण्याचे केले आवाहन
पाचोरा-
येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चा पदग्रहण समारंभ शुक्रवार, दिनांक 26 रोजी सायंकाळी ७:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हॉटेल स्वप्निल रेसिडेन्सी, भडगाव रोड पाचोरा येथे आयोजित या पदग्रहण समारंभाला रोटरीचे भावी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. राजेश पाटील, असिस्टंट गव्हर्नर अभिजीत भंडारकर आणि मोटिवेशनल स्पीकर यांनी गनी मेमन उपस्थित राहणार आहेत.
आगामी वर्षाच्या अध्यक्षपदी रोटेरियन डॉ. पवनसिंग पाटील व सेक्रेटरी पदी प्रा. शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. या पदग्रहण सोहळ्या प्रसंगी शहरातील मान्यवर अधिकारी, पदाधिकारी, समाजसेवक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मावळते अध्यक्ष रो. डॉ. पंकज शिंदे, मावळते सेक्रेटरी रो. डॉ. मुकेश तेली यांनी केले आहे.