पाचोरा आगारात प्रवाश्यांच्या सेवेत लवकरच ई बसेस धावणार…
जळगाव-
दिनांक 26 जुलै 2024 रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन जळगाव जिल्हा परिवहन विभाग नियंत्रक श्री. भगवान जागनोर डी. सी.साहेब यांचे अध्यक्ष ते खाली संपन्न झाला.त्या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांचे व त्यांचे सोबत पाचोरा अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पाचोरा न्याय व विधी समिती प्रमुख व पाचोरा वकील संघाचे सचिव ॲड.निलेश सूर्यवंशी ,शिक्षण समिती प्रमुख श्री सुधाकर पाटील सर , अन्न व औषध समिती प्रमुख श्री गिरीश दुसाने या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन जिल्हा विभाग नियंत्रक श्री जाग नोर डी.सी.साहेबांचे हस्ते स्वागत करण्यात आले.
सदर प्रसंगी पिंपळगाव हरेश्र्वर येथील ज्येष्ठ प्रवासी श्री रोडुबा देवराम पाटील व श्री वसंत शंकर चव्हाण वरसाडे तांडा तालुका पाचोरा यांचे प्रवासी राजा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब पुष्प देऊन विभाग नियंत्रक श्री जागनोर् साहेबांनी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख यांचे हस्ते स्वागत सन्मान करण्यात आला.
त्या नंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे डॉ.अनिल देशमुख यांनी पाचोरा येथील पांडव नागरी ,भारत डेअरी ,जळगाव चौफुली ,जळगाव येथील रायसोनी कॉलेज, व जैन हिल्स अशा विविध ठिकाणी बस थांबा असूनही बसेस थांबत नाहीत ,तसेच पाचोरा आगारातील प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी मिलानेसाठी चे आगार व्यवस्थापन असावे, तसेच पाचोरा आगारात कमीत कमी 25 ई बस मिळाव्यात तसेच जिल्ह्यातील 11 ही आगरना ही मिळाव्यात अशी महत्वपूर्ण मागणी डॉ.अनिल देशमुख यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष म्हणून केली आहे.त्यावर प्रतिसाद देत विभाग नियंत्रक श्री जागनोर् साहेबांनी 15 ई बस प्रतेक आगारात मिळतील असे प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.त्यावर उपस्थितांनी त्यांचे आनंदात उत्साहात स्वागत केले ,तसेच उपरोक्त प्रवासी थांबे वाहतूक विभागास सूचना देऊन तेथे परिवहन मंडळ चे बोर्ड आठ दिवसात लावण्यात यावेत अशा सूचना दिल्यात.
तसेच श्री सुधाकर पाटील शिक्षण समिती यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडण्यात याव्यात व कार्यरत सर्व बसेस थांब्यावर थांबण्यास सक्त सूचना देण्याची मागणी केली त्यास तशा सूचना विभाग नियंत्रक यांनी नव्याने काढण्यास आगार व्यवस्थापक यांना दिल्यात.
ॲड.निलेश सूर्यवंशी न्याय व विधी समिती प्रमुख यांनी बस अपघात टाळणे साठी वेग मर्यादा व वाहतूक नियमांचे पालन साठी वाहक यांना सक्त सूचना द्याव्यात असे सुचविले त्यास ही कार्यवाही करण्यात येईल म्हणून विभाग नियंत्रक यांनी आश्र्वासित केले.या प्रसंगी कृष्णा चंद्रकांत पाटील राजीव गांधी कॉलनी रहिवासी व त्यांची कन्या कुमारी वैष्णवी कृष्णा पाटील एमएस्सी केमिस्ट्री यांनी रायसोनी कॉलेज जळगाव येथे बस थांबत नसल्याची लेखी निवेदन दिले त्यावर ग्राहक पंचायत ने हा मुद्दा उपस्थित केला असून जैन हिल्स व रायसोनी कॉलेज या दोन्हीही ठिकाणी बसेस थांबल्या जातील त्यासाठी जळगाव आगार देखरेखी साठी काही दिवस निरीक्षक ही नेमतील असे आश्र्वासित केले आहे. त्या नंतर पाचोरा ते चिंचखेडा बुद्रुक तारखेडा गळवाडे ही बस सकाळी 11 ऐवजी 10 ते साडे दहा चे दरम्यान सोडावी म्हणजे विद्यार्थी वर्गास सकाळी 11 वाजता तारखेडा येथील शाळेत वेळेवर उपस्थित राहता येईल अशी मागणी चिंच खेडा बुद्रुक येथील पोलिस पाटील पोपट भाऊराव पाटील , व माजी सरपंच फुलचंद भाऊराव पाटील यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे मागणी केल्या प्रमाणे मान्य करण्यात आली व तेथील स्टेज भाडे एकच स्टेज असल्याने भाडे वाढ करण्यात येऊ नये ही पण मागणी मान्य करण्यात आली आहे.या कार्यक्रमास जिल्हा विभाग नियंत्रक डी. सी.साहेब भगवान जोगनोर्,पाचोरा आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील,लेबर ऑफिसर कमलेश भावसार ,किशोर महाजन विभाग निरीक्षक जळगाव , पाचोरा कार्यशाळा अधीक्षक योगेश जाधव , वाहतूक निरीक्षक श्री राहुल नजांन ,प्रयास पाटील ,वरिष्ठ लिपिक कानकामल सोनार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वतः विभाग नियंत्रक श्री भगवान जागनोर साहेब यांनी पाचोरा आगरास भेट देऊन प्रवासी ,ग्राहक पंचायत व विद्यार्थी पालक प्रतिनिधी ,प्रत्यक्ष आज प्रवास करणारे प्रवाशी यांचे स्वागत करून या सर्वांच्या समस्या अडी अडचणी जाणून घेत सुसंवाद साधला त्या बद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे व उपस्थित समुदाय तर्फे विभाग नियंत्रक श्री भगवान जागनोर् यांचे डॉ.अनिल देशमुख यांनी गुलाब पुष्प देऊन मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केलेत.