नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय,शाळा क्रमांक 113,महापे येथे शिक्षण सप्ताहाचा समारोप
नवी मुंबई-
दिनांक 22 जुलै ते 27 जुलै 2024 या दरम्यान शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला होता आज दिनांक 28 जुलै 2024 वार रविवार रोजी या शिक्षण सप्ताहाचा समारोप करण्यात आला त्याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय, शाळा क्रमांक 113 महापे .येथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.
या स्नेह भोजनाचा आस्वाद घेताना विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक बडगुजर , सारिका पाटील , संध्या झाकणे , मंदा पिंगळे , विकी मोरे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही यावेळेस या स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन आज शिक्षण सप्ताहाचा समारोप करण्यात आला.प्रथमता महापे नगरीत सकाळी शाळेच्या तर्फे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले या प्रभात फेरीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक पालक सहभागी झाले होते. या प्रभाग फेरीमध्ये शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याबाबत शिक्षण सप्ताहाचे महत्व सांगण्यात येत होते.
या संपूर्ण समारोपाचे सुंदर नियोजन शाळेचे मुख्याध्यापक दिपक बडगुजर यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडले.